Tuesday, 10 February 2009

२६/११ ला पाकिस्तानी आतंकवादी मुंबईत घुसले आणि मराठी, यूपी, बिहारी म्हणत लडणारा देश पुन्हा एकदा एकजूट झाला. मोठ मोठे अधिकारी व त्यांच्या सहकार्यांच्या मृत्युने देश कासाविस झाला. सगळीकडे देशसेवेची, समाजकार्याची जणू लाटच पसरली. सम्पूर्ण देश पाकिस्तानविरुद्धच्या रागाने लालबुंद झाला आणी तरुण मंडळी तर अगदी पाकिस्तान संपविण्याच्याच गोष्टी करु लागले. प्रत्येकाला देशासाठी काहीतरी करावास वाटत होत. लहानमोठी, विषेशतः तरुण मंडळी group करुन भारत सरकारने काय केल पहिजे आणी काय नाही यावर discussions करतांना दिसत होती. शेवटी politicians चोर आहेत, ते देश विकायला निघाले आहेत, यांच्याकडून काहिच होणार नाहि यांवर शिक्कामोर्तब करतांना आणी पर्याय नाही म्हणत शांत बसताना दिसत होती. जवळपास प्रत्येकाच्याच मनात देशासाठी काहीतरी करायच ही भावना जोर धरत होती पण नेमक काय करायच हे काही कोणी ठरवत नव्हतं.

याच काळात माझ्या mailbox मध्ये एक mail येऊन धडकला. हा mail होता Infosys ने त्यांच्या employees (कर्मचारी म्हणायला थोड odd वाटत म्हणुन) साठी लिहिलेला, त्यात त्यांनी employees साठी एक scheme आणली होती. scheme नुसार ज्याला कुणाला समाजसेवा करायची आहे त्याने एक वर्षासाठी कुठलाही एक full time NGO join करायचा व वर्षभर जी काही salary असेल त्याच्या निम्मी salary घ्यायची. scheme तशी खुप साधी आणि सरळ होती. समाजसेवा करतांना पगारही मिळणार होता. पण ही scheme फक्त पहिल्या पन्नास employees साठी होती. म्हणजे जे कुणी सर्वप्रथम reply करेल त्या पन्नास लोकान्ना ह्या scheme चा फायदा होणार होता. पण एवढ्या मोठ्या ६० ते ७० हजार लोकांच्या कंपनीत साधे पन्नास लोक यासांठी तयार होऊ नयेत हे एक आश्चर्य. का हो! discussions करुन problem solve होतात?

आमची room ही याला अपवाद नाही. आम्हीहि असेच discussions करत असतो. एके दिवशी आमचा भिखू आमच्या room वर आला. वाचनाची आवड नसलेला व दहावीपर्यंत इतिहास, भूगोल फक्त मार्क मिळवण्यासाठी वाचणारा मी, आज चक्क आधुनिक भारताचा इतिहास वाचत होतो. सुरुवात झाली ती महात्मा गांधी आणि जवाहर नेहरुंपासुन. माझ्यामते ते आपले खरे Hero होते. जशी सेहवागने करुन दिलेली चांगली सुरुवात आपला विजय निश्चित करते तसच काहिस मत होतं माझं ह्या नेत्यांबद्दल. पण जेव्हा सर्वचजण त्यांच्याविरुद्ध बोलायला लागले तेव्हा वाटल कि आपलच काहीतरी चुकत असाव. मागील ६०-६२ वर्षात भारताने एकंदरीत समाधानकारक प्रगती केली आहे व त्याच क्ष्रेय हे सर्व scientist, businessmen, आपण व त्याचबरोबर politicians यांनाही जात हे मी माणत होतो. परंतु भिखुचा आदर्श जपान असल्याच जाणवल. भिखू म्हणाला, "जपानने महायुद्धानंतर किती प्रगती केली माहित आहे का तुम्हाला?" त्याला उत्तर देताना मी बोललो, "का, आपण नाही का केली प्रगती?, कुठे मागे आहोत आपण?". "होना! मग का नाही संपवत पाकिस्तानला? अमेरीकेने नाही का तालिबानला संपवल.", भिखू उद्ग़ारला. आपल नुकसाण झालं तरी चालेल पण पाकिस्तानला संपवायच असच त्याला म्हणायच होतं. त्याच्या प्रश्नाच उत्तर तर माझ्याकडे नव्हतं, पण युध्दाने कुणाचाही फायदा होत नाही हे मी माणत होतो. मी त्याला सरकारने घेतलेले काही चांगले निर्णय समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला.

भिखू थोडासा convince होताना दिसला पण मनात लगेच एक प्रश्न आला, मी हे discussion भिखूला convince करण्यासाठी तर नाही ना करत होतो? म्हणजे फक्त समोरच्याला convince केलं म्हणजे झालं, फक्त यांचसाठी करतो आपण discussions, नक्किच नाही. मग आपण काय केल पाहिजे याचा विचार केला कि सरफरोश पिक्चर मधले आमिरचे dialog आठवतात. नंतर वाटतं आपण IAS, IPS नाही बनलो तर कमीतकमी vote तर करु शकतो. यांवर आमच्या रॉकीबाबाने एक चांगला प्रश्न विचारला. मतदान करतांना तु उमेदवार कसा निवडतोस हा तो प्रश्न. रोकीचे प्रश्न तसे विचार करायला लावणारे असतात. माझ्यामते एखाद्या व्यक्तीचे विचार चांगले असतील, त्याला खरच काम करायच असेल तर तो कुठलेही problem solve करु शकतो म्हणुन मी उमेदवाराचे विचार व त्याची मूल्ये बघतो. पण रॉकीला काहीतरी वेगळच सांगायच होतं. "जर त्याला लोकांचे काय problem आहेत हेच माहित नसेल तर?" रॉकीने विचारल. मला काही सुचण्याच्या आधीच त्याने मला अनिल अवचट यांनी लिहीलेल 'प्रश्न आणि प्रश्न' (रॉकी याला 'पश्न आणि पश्न' असे उच्चारतो असं आमच्या pats च्या लक्षात आलं) हे पुस्तक वाचायला दिलं. या पुस्तकात आहेत काही प्रश्न आणि त्यांचे प्रश्न.

समजसेवा म्हणजे लोकं काय काय करतात व काय करु शकतात याचा आढावा मी माझ्या पुढच्या blog "प्रश्न आणि प्रश्न" मधे घेण्याचा प्रयत्न करेल.

5 comments:

  1. Blog is good . its good start but i am not agree with you about your thoughts on जवाहर नेहरुं.
    The way you written , the first two paragraphs are very good means reader wants to continue to read up to end when he is reading the first two, but in third & fourth paragraph reader thinks something different than first two(you are going away from the context & readers think ok boss leave it).
    But overall presentation is good & it’s your first blog, you will learn how to attract the reader (because blog without reader in not useful like newspaper without reader) .
    Whatever I have written is just my experience . I read many blogs , article , stories , books & just learnt one thing we need attract the reader like our Marathi writer P.L.Despande& other .
    Keep it up …………………………… 

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लेख !! विशेष म्हणजे तु हा ब्लॉग् सामाजिक अ्डचणींच्या
    जाणिवे्तुन आणी त्यातुन काहीतरी करण्याचा तळमळीतुन सरु केला आहेस म्हणुन मि तुला शुभेच्छा देतॊ.

    भविष्यात अशाच काही समजाभिमुख जाणिवे्तुन लिहीलेल्या लेखांची अ्पेक्षा करतो.

    ReplyDelete
  3. Funtanstic start..... m waiting for next exciting post...

    .... Nitin

    ReplyDelete
  4. @Swapnil:

    I think, Your suggestion of 'how-to-attract-readers' kind of writing style doesn't match with the intent author has started this blog. This blog is totally work with the issues revolve around social welfare hence this is no way an entertaining blog. Anyway even if author tries to write in your suggested way while keeping with the intent, I afraid that author may loose its natural sense of true reflection of its points regarding social welfare. Intention is clear, author has to write about the facts,problems and possible solutions and it should be written straight-forward without any decoration of unnecessary things !

    P.S. Again this is my point of view. author may have different views.

    ReplyDelete
  5. Sandip Parkhe- its a goood topic u have selected. i think it is necessory toget compulsion of compliting degree of any social leader in india. Get start from ourself.

    ReplyDelete